उद्यम पोर्टलवर ४ कोटी ८० लाख जणांनी नोंदणी केली आहे असं लोकसभेत प्रश्नोत्तराच्या तासात सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री जीतन राम मांझी यांनी सांगितलं. उद्यम पोर्टल, पीएम विश्वकर्मा योजना आणि या क्षेत्रातील विविध उपक्रमांद्वारे २० कोटी रोजगाराच्या संधी निर्माण झाल्याचही त्यांनी म्हटलं आहे. क्रेडिट गॅरंटी स्कीम, आत्मनिर्भर योजना आणि इतर उपक्रमांतर्गत देशात रोजगाराच्या संधी वाढवण्याचा प्रयत्न सुरु असून रोजगार निर्मितीसाठी महिला आणि तरुणांवर विशेष भर देण्यात येत असल्याची माहिती त्यांनी दिली.
Site Admin | August 8, 2024 6:39 PM | Minister Jitan Ram Manjhi
उद्यम पोर्टलवर ४ कोटी ८० लाख नागरिकांची नोंदणी – मंत्री जीतन राम मांझी
