प्रधानमंत्री इंटर्नशिप अर्थात आंतरवासिता योजनेसाठी ऑनलाइन पोर्टलवर कालपासून नोंदणी सुरू झाली आहे. या महिन्याच्या 25 तारखेपर्यंत ही नोंदणी सुरू राहणार आहे. या योजनेसाठी पोर्टलवर आतापर्यंत 193 कंपन्यांनी 91 हजार आंतरवासिता संधी उपलब्ध करून दिल्या आहेत. 2024-25 या आर्थिक वर्षात 1 लाख 25 हजार आंतरवासिता संधी उपलब्ध करून देण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे. हा प्रायोगिक तत्वावरील उपक्रम असून यासाठी एकंदर 800 कोटी रुपये खर्च येणार आहे. 21 ते 24 वर्षे वयोगटातील एक कोटी उमेदवारांना पाच वर्षांसाठी 12 महिन्यांची इंटर्नशिप देण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे. आंतरवासिता उमेदवाराला एका वर्षासाठी दरमहा 5 हजार रुपये तर एक रकमी अनुदान म्हणून 6 हजार रुपये दिले जाणार आहेत. 737 जिल्ह्यांमध्ये तेल, वायू आणि ऊर्जा, प्रवास आणि आदरातिथ्य, ऑटोमोटिव्ह आणि बँकिंग आणि वित्तीय सेवांसह 24 क्षेत्रांमध्ये संधी उपलब्ध आहेत.