रत्नागिरीत उद्यापासून क्षेत्रीय वैदिक संमेलन होणार असून, त्यात चारही वेदांचं पठण केलं जाणार आहे. कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाच्या रत्नागिरीतल्या भारतरत्न डॉ. पांडुरंग काणे संस्कृत अध्ययन उपकेंद्राने हे संमेलन आयोजित केलं आहे. तीन दिवस चालणाऱ्या या संमेलनात १०० वैदिक मान्यवर सहभागी होणार असून, पाच ठिकाणी ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद या चारही वेदांमधल्या विशिष्ट शाखांचं सामूहिक पारायण तीन दिवसांत केलं जाणार आहे.