देशातलं क्षयरोगाचं कमी झालेलं प्रमाण, हे समर्पण भावनेनं केलेल्या नाविन्यपूर्ण प्रयत्नांचं फलित असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. भारतात २०१५ ते २०२३ या कालावधीत क्षयरोगाचं प्रमाण १७ पूर्णांक ७ दशांश टक्क्यांनं घसरल्याचं जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालात म्हटलं आहे. आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा यांनी काल याबाबत समाज माध्यमांवरून माहिती दिली होती. त्याचाच दाखला देत प्रधानमंत्र्यांनी समाज माध्यमावरून भारताच्या या प्रगतीचं कौतुक केलं. या पुढेही सरकार देशाला क्षयरोगमुक्त करण्यासाठी सामूहिक भावनेनं काम करत राहील असंही प्रधानमंत्र्यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे
Site Admin | November 3, 2024 7:59 PM | kshayrog | PM Narendra Modi