ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी आणि पुणे या जिल्ह्यांसाठी उद्या सकाळपर्यंत हवामान विभागानं रेड अलर्ट जारी केला आहे. या जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी अति जोरदार पावसाची दाट शक्यता असून उदया नाशिकमधे रेड अलर्ट दिला आहे. येत्या दोन दिवसांत पुणे, नाशिक, सातारा जिल्ह्यात तुरळक ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. या कालावधीत राज्यात अनेक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. नैऋत्य मोसमी पावसाची परतीची रेषा कायम असून कालपासून कोकणात काही ठिकाणी, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस झाला.
Site Admin | September 25, 2024 8:28 PM | IMD | weatherupdate
उद्या राज्यातील काही जिल्ह्यात ‘रेड अलर्ट’
