डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

गडचिरोली आणि चंद्रपूरला आज रेड अलर्ट

गेल्या चोवीस तासात, विदर्भात काही ठिकाणी जोरदार तर तुरळक ठिकाणी अतिजोरदार पाऊस पडला. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी, तर विदर्भात आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडला.

येत्या दोन दिवसात कोकण, आणि विदर्भात बहुतांश ठिकाणी, मराठवाड्यात अनेक ठिकाणी तर मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. या काळात कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. 

  हवामान विभागानं मुसळधार पावसामुळं गडचिरोली आणि चंद्रपूरला आज रेड अलर्ट दिला आहे. गोंदियात आज आणि उद्या तर भंडारा आणि नागपूरसाठी उद्या ऑरेंज अलर्ट दिला आहे. 

सर्वाधिक वाचले

सर्व पहा