डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

महाराष्ट्रात विदर्भात काही ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा

महाराष्ट्रात विदर्भात काही ठिकाणी आणि मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी जोराचे वारे आणि वीजांसह मुसळधार पाऊस पडण्याचा इशारा हवामान विभागानं दिला आहे.

 

 

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पैठण इथल्या जायकवाडी धरणाचे आणखी सहा दरवाजे आज दुपारी उघडण्यात आले. आता धरणाचे १८ दरवाजे अर्ध्या फुटाने उचलून सुमारे साडे नऊ हजार घनफूट प्रतिसेकंद वेगाने पाणी गोदावरी नदीपात्रात सोडण्यात येत आहे.

 

गोंदिया जिल्ह्यात काल रात्री ढगफुटी सारखा पाऊस पडल्यामुळे जिल्ह्यात पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. गोंदिया शहरातून वाहणाऱ्या नाल्यालगतचं घर पाण्यात कोसळून एकाचा मृत्यू झाला. गोंदिया जिल्ह्यात सूर्याटोला भागाला बांध तलाव ओसंडून वाहू लागल्यामुळे अनेक घरात पाणी शिरलं आहे तर ग्रामीण भागात नदी नाले ओसंडून वाहू लागले असून, आणि अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. 

सर्वाधिक वाचले

सर्व पहा