दहावी आणि बारावीच्या परीक्षा येत्या 11 फेब्रुवारीपासून सुरु होत आहेत. परीक्षा काळात विद्यार्थ्यांचं समुपदेशन करण्यासाठी राज्य मंडळस्तरावर समुपदेशकांची नियुक्ती करण्यात आली असल्याची माहिती राज्य मंडळ सचिव डॉक्टर माधुरी सावरकर यांनी दिली. सकाळी 8 ते रात्री 8 या कालावधीत विद्यार्थ्यांना भ्रमणध्वनीद्वारे निःशुल्क समुपदेशन मिळणार असल्याचं त्यांनी सांगितलं.