रशिया आणि युक्रेननं काल एका रात्रीत परस्परांवर विक्रमी संख्येने ड्रोन हल्ले केले. रशियानं काल रात्री एकंदर 145 ड्रोन हल्ले केले, तर युक्रेननं देखील मॉस्कोच्या दिशेनं 34 ड्रोन हल्ले केले. 2022 मध्ये युद्ध सुरू झाल्यापासून रशियाच्या राजधानीवर झालेला हा सर्वात मोठा ड्रोन हल्ला आहे, यामुळे शहरातील तीन प्रमुख विमानतळांवरून उड्डाणे वळवण्यात आली आणि एक व्यक्ती जखमी झाली. मात्र मोठं नुकसान झालेलं नाही. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी उत्तर कोरियासोबत परस्पर संरक्षण तरतूद समाविष्ट असलेल्या देशाच्या धोरणात्मक भागीदारीबाबतच्या करारावर स्वाक्षरी केल्यानंतर हा ड्रोन हल्ला झाला.
Site Admin | November 11, 2024 10:51 AM | ड्रोन हल्ले | रशिया आणि युक्रेन