डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

देशात विक्रमी इंधन वायू उत्पादन, पंतप्रधानांकडून प्रशंसा

विकसित भारताचं उद्दीष्ट साध्य करण्याच्या दृष्टीनं उर्जा क्षेत्रातलं स्वावलंबन अतिशय महत्त्वाचं आहे असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. देशानं इंधन वायू उत्पादनाच्या क्षेत्रात नवा उच्चांक गाठल्याचं पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी समाजमाध्यमावरील संदेशात नमूद केलं आहे. त्यावर प्रतिक्रिया देताना पंतप्रधान मोदी यांनी विक्रमी वायू उत्पादनाबद्दल देशवासियांचं अभिनंदन केलं. हे विक्रमी उत्पादन विकसित भारत निर्मितीसाठी सरकार वचनबद्ध असल्याचा प्रत्यक्ष पुरावा असल्याचं त्यांनी या संदेशात म्हटलं आहे. 2020-21 मध्ये नैसर्गिक वायूचं उत्पादन सुमारे 29 दशलक्ष घनमीटर झालं होतं. ते 2023-24 मध्ये 37 दशलक्ष घनमीटर झालं आणि 2026 पर्यंत सुमारे 45 दशलक्ष घनमीटर इतकं होणं अपेक्षित आहे अशी माहिती पेट्रोलियम मंत्र्यांनी दिली आहे.

 

सर्वाधिक वाचले

सर्व पहा