डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

‘परीक्षा पे चर्चा’ कार्यक्रमासाठी विक्रमी नोंदणी

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यासोबत परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी यावेळी विक्रमी सव्वा तीन कोटी विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांनी नोंदणी केली आहे. यात परदेशी विद्यार्थ्यांचाही समावेश आहे. या कार्यक्रमाची आठवी आवृत्ती शालेय स्तरावर 12 जानेवारीपासून सुरू झाली असून, ती 23 जानेवारी रोजी संपेल. पंतप्रधान मोदींच्या ‘परीक्षा पे चर्चा’ या अनोख्या उपक्रमाचा उद्देश परीक्षेशी संबंधित ताण कमी करणे हा आहे. या कार्यक्रमादरम्यान, प्रधानमंत्री विद्यार्थ्यांच्या प्रश्नांची उत्तरे देतात आणि आत्मविश्वासाने आणि सकारात्मक मानसिकतेने परीक्षा देण्यासाठी उपयुक्त सूचना देतात.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा