जागतिक कृषी मंचातर्फे पर्यावरण रक्षण, शाश्वत विकास आणि हरित महाराष्ट्र यासाठी राज्य सरकारनं केलेल्या कामाची दखल घेण्यात आली आहे. या कामगिरीसाठी उद्या जागतिक बांबू दिनाचं औचित्य साधून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा सन्मान केला जाणार आहे. मुंबईत होणाऱ्या या कार्यक्रमाला 20 देशांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. पर्यावरण रक्षणासाठी त्वरीत कृतीची साद संयुक्त राष्ट्रांनी दिली होती. त्याला प्रतिसाद देणारा भारत हा पहिलाच देश ठरला असून महाराष्ट्र हे भारतातलं पहिलंच राज्य ठरलं आहे. राज्यानं पर्यावरण रक्षणासाठी पर्यावरण आणि शाश्वत विकास कृती समितीची स्थापना केली आहे. तसंच औष्णिक विद्युत प्रकल्पात 5 टक्के जैव इंधन वापराचे निर्देश देऊन त्यासाठी 11 लाख हेक्टर क्षेत्रावर बांबू लागवडीचा निर्णय घेण्यात आला आहे.
Site Admin | September 17, 2024 10:08 AM | CM Eknath SAhinde | Eknath Shinde | maharashtra goverment | rajya sarkar