व्यक्ति ते व्यक्ती आर्थिक व्यवहारातील गैरप्रकार रोखून गुंतवणुकदारांचं हित जपण्यासाठी रिझर्व बँकेनं नव्या मार्गदर्शक सूचना काल तत्काळ प्रभावानं जाहीर केल्या. पारंपरिक बँकींग पद्धतीला फाटा देऊन पी टू पी माध्यमांमुळे धनको आणि ऋणको थेट एकमेकांच्या संपर्कात येतात. यामध्ये वाढीव कर्ज पुरवठा किंवा हमी देताना निर्माण होणारी जोखीम गृहित धरुन अशा पुरवठादारांवर विमा उत्पादनांची विक्री करण्याबाबत आता निर्बंध घातले आहेत. व्यवहारांमध्ये मुद्दल, व्याज किंवा दोन्हींचे नुकसान झाल्यास ते धनकोने भरुन द्यावं लागेल असं नव्या निर्देशांमध्ये म्हटलं आहे.
Site Admin | August 20, 2024 10:31 AM | RBI