डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

December 10, 2024 1:47 PM | RBI | Shaktikanta Das

printer

रिझर्वबँकेसमोर अद्याप चलन फुगवटा आणि सायबर सुरक्षा अशा प्रकारच्या समस्या – शक्तिकांत दास

रिझर्व्ह बँक ही एक समृद्ध परंपरा असलेली एक महान संस्था आहे, असं प्रतिपादन मावळते गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी आज केलं. मुंबईत झालेल्या वार्ताहर परिषदेत ते बोलत होते. सहा वर्षांच्या कालावधीत केलेल्या कामगिरीचं श्रेय आपण या संस्थेला आणि सहकाऱ्यांना देत असल्याचं दास यांनी सांगितलं. 

 

रिझर्व्ह बँकेचा गव्हर्नर बनण्याची संधी आपल्याला मिळणं हे आपलं भाग्य असून भारतीय अर्थव्यवस्थेला फायदेशीर ठरतील असे निर्णय आपण घ्यायचा प्रयत्न केला. मात्र, तरीही अनेक समस्या आजही या संस्थेसमोर आहेत, असंही ते म्हणाले. चलन फुगवट्याचं नियमन, बदलत्या जागतिक परिस्थितीनुसार अर्थव्यवस्थेवर होणारे परिणाम, सायबर सुरक्षा आणि संभाव्य धोके, बदलत्या तंत्रज्ञानानुसार यंत्रणेतले बदल तसंच या संदर्भातल्या नवीन कल्पना आणि सुधारणा अशा प्रकारच्या समस्या आणि प्रश्न अद्यापही बँकेच्या समोर असल्याचं दास यांनी वार्ताहर परिषदेत सांगितलं. शक्तिकांत दास आज रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर म्हणून निवृत्त होत असून त्यांच्या जागी संजय मल्होत्रा यांची गव्हर्नर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. 

सर्वाधिक वाचले

सर्व पहा