डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

December 27, 2024 2:46 PM | RBI

printer

देशातल्या बँकांच्या नफ्यात सलग सहा वर्षं वाढ झाल्याची रिझर्व्ह बँकेच्या अहवालात माहिती

देशातल्या बँकांच्या नफ्यात २०२३-२४ या आर्थिक वर्षापर्यंत सलग सहा वर्षं वाढ झाली असून, चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाहीतही वाढीचा कल कायम असल्याचं भारतीय रिझर्व्ह बँकेनं म्हटलं आहे. रिझर्व्ह बँकेनं देशातील बँकिंग आणि त्यातला कल याबाबतचा एक अहवाल काल प्रसिद्ध केला, त्यात ही माहिती देण्यात आली आहे. बँकांच्या मालमत्तेची गुणवत्ता सुधारत राहिली असून, अनुत्पादित कर्जांचं प्रमाण १३ वर्षांतील सर्वांत कमी पातळीवर राहिलं. चालू वर्षाच्या मार्च अखेरीला एनपीए २ पूर्णांक ७ दशांश टक्के आणि सप्टेंबरच्या अखेरीला २ पूर्णांक ५ दशांश टक्के नोंदवलं गेल्याचंही या अहवालात नमूद करण्यात आलं आहे.

 

सलग तिसऱ्या वर्षी नागरी सहकारी बँकांच्या मालमत्तेची गुणवत्ता सुधारली आहे. भांडवल पर्याप्तता आणि नफाही वाढला आहे. बिगर-बँकिंग वित्तीय कंपन्यांनी कर्जवितरणात दुहेरी आकड्यात वाढ दर्शविली आहे, तर त्यांच्या एकूण थकीत कर्जांचे प्रमाण या वर्षी सप्टेंबरच्या अखेरीस ३ पूर्णांक ४ दशांश टक्क्यापर्यंत घसरले आहे, असे रिझर्व्ह बँकेनं म्हटलं आहे.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा