कर्जविषयक माहिती देण्यासंबंधीच्या निर्देशांचं पालन न केल्याबद्दल काही वित्तीय संस्थांना रिझर्व्ह बँकेने काल दंड ठोठावला. यात सिटीबँकेला 29 लाख रुपये, आशिर्वाद मायक्रो फायनान्स कंपनीला सहा लाख वीस हजार आणि जेएम फायनान्शियल होम लोन लिमिटेडला एक लाख पन्नास हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. वेगवेगळ्या श्रेणीतील कर्जदारांकडून वेगवेगळे व्याजदर आकारण्याची कारणे न देणे, आणि नियामक अनुपालनातील त्रुटींमुळे ही कारवाई करण्यात आल्याचं रिझर्व्ह बँकेनं म्हटलं आहे.
Site Admin | February 22, 2025 10:19 AM | RBI
नियमांचे पालन न केल्याबद्दल रिझर्व्ह बँकेने काही वित्तीय संस्थांना दंड ठोठावला
