चुकीच्या बँक खात्यात निधी हस्तांतरण होऊ नये यासाठी लाभार्थीच्या खात्याचं नाव पडताळण्याची सुविधा आता उपलब्ध होणार आहे. रिझर्व्ह बँकेनं यासंदर्भात निवेदन जारी केलं आहे. आर टी जी एस आणि एन ई एफ टी प्रणाली तर्फे पैसे हस्तांतर करण्यापूर्वी या सुविधेचा वापर करता येईल.
इंटरनेट बँकिंग तसंच मोबाइल बँकिंग सुविधेचा वापर करताना ग्राहकांना प्राप्तकर्त्याचं नाव आणि खात्याचे तपशील यांची पडताळणी करता येईल.
येत्या १ एप्रिलपासून ही सुविधा सुरु होणार असून त्यासाठी नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया आणि सर्व बँकांनी आवश्यक ती पावलं उचलावीत, असे निर्देश रिझर्व्ह बँकेनं दिले आहेत.