भारतीय रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीनं सलग दुसऱ्या वेळी रेपो दरात कपात केली आहे. त्यामुळे आता रेपो दर ६ टक्क्यांवर आला आहे. तसंच एसडीएफ दर ५ पूर्णांक ७५ शतांश टक्के आणि एमएसएफ दर ६ पूर्णांक २५ शतांश टक्के करण्यात आला आहे.
सोन्याच्या दरवाढीमुळे किरकोळ महागाई दरात मात्र वाढ होऊन तो ४ पूर्णांक १ दशांश टक्के झाल्याचं आरबीआयनं म्हटलं आहे. जागतिक बाजारातील अस्थिरता, हवामान बदल यामुळे २०२५-२६ मध्ये ग्राहक किंमत निर्देशांक आधारित महागाई दर ४ टक्के राहील असा अंदाज बँकेनं व्यक्त केला आहे.
वर्तमान आर्थिक वर्षात सकल देशांतर्गत उत्पादन विकास दर साडेसहा टक्के असेल. कृषी आणि उत्पादन क्षेत्रात वाढ होईल मात्र सेवा क्षेत्रातली दोलायमान स्थिती कायम राहील असं बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी सांगितलं.