देशातल्या नागरिकांकडून रोख रकमेचा वापर कमी होत असल्याचं रिझर्व्ह बँकेनं म्हटलंय. गेल्या ३ वर्षात डिजिटल व्यवहारांचं प्रमाण १९ टक्क्यांवरून ४८ टक्क्यांपर्यंत वाढलं आहे. यात यूपीआयचा वाटा महत्त्वाचा आहे, असं भारतीय रिझर्व्ह बँकेच्या अर्थतज्ज्ञांच्या एका शोधनिबंधात म्हटलं आहे. २०१६ मध्ये सुरू झालेल्या यूपीआयचा गेल्या ५ वर्षांत किरकोळ डिजिटल व्यवहारांत सर्वाधिक वाटा आहे. खरेदी करताना डिजिटल पद्धतीनं पैसे देण्याचं प्रमाण ६ पटीनं वाढलं आहे. दोन व्यक्तींमधलं निधी हस्तांतरणंही मोठ्या प्रमाणात वाढल्याचं या अहवालात म्हटलं आहे.
Site Admin | October 23, 2024 8:40 PM | RBI