रत्नागिरी तालुक्यातल्या झाडगाव एमआयडीसी क्षेत्रात १९ हजार ५५० कोटी रुपयांची गुंतवणूक होणार असलेल्या वेल्लोर सेमीकंडक्टर प्रकल्पाचं भूमिपूजन आज पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते झालं. कंपनीतर्फे रत्नागिरीतल्या दीड हजार युवकांना परदेशात प्रशिक्षण देऊन इथल्या प्रकल्पात नोकरी मिळणार आहे.
मुलांनी शिकून परदेशात नोकरी करावी, असं अनेकांचं स्वप्न असतं. ते स्वप्न या प्रकल्पामुळे रत्नागिरीतच पूर्ण होणार आहे, असं सामंत यांनी सांगितलं. या प्रकल्पातून मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. भविष्यात राज्यातल्या सर्वाधिक जीडीपीच्या पहिल्या पाचात रत्नागिरीचा समावेश असेल, असं प्रतिपादन व्हीआयटी सेमिकॉन्स पार्क प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक ताजपूर संपथ कण्णन यांनी केलं.