रत्नागिरी तालुक्यातल्या राई बंदरात महिला प्रभाग संघातर्फे चालवल्या जाणाऱ्या देशातल्या पहिल्या हाऊसबोटचं लोकार्पण आज झालं. उद्योगमंत्री आणि रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यावेळी उपस्थित होते. कोतवडे इथल्या एकता महिला प्रभाग संघातर्फे चालवली जाणार आहे. महिलांनी हाऊसबोट चालवण्याचं प्रशिक्षण घ्यावं, असं उदय सामंत यावेळी म्हणाले. या हाऊसबोटीमधे पर्यटकांसाठी अत्याधुनिक स्वरुपाचे दोन शयनकक्ष, डेक अशी सुविधा आहे. तसंच स्थानिक खाद्यसंस्कृती, लोककलांचा आस्वादही या बोटीवर घेता येणार आहे.
Site Admin | February 20, 2025 7:48 PM | Houseboat | Ratnagiri
रत्नागिरीत महिला प्रभाग संघाच्या हाऊसबोटचं लोकार्पण
