डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

December 13, 2024 10:27 AM | Ratnagiri

printer

रत्नागिरीत माध्यमिक विद्यालयात वायूगळती, अनेक विद्यार्थ्यांना त्रास

रत्नागिरी जिल्ह्यातल्या जयगडमध्ये काल दुपारी झालेल्या वायुगळतीमुळे एकंदर ५८ जणांना त्रास झाला असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. सर्व व्यक्तींची प्रकृती स्थिर असून, त्यांना आज रुग्णालयातून घरी पाठवण्यात येईल, अशी माहिती प्रशासनातर्फे देण्यात आली. बाधित ५८ जणांमध्ये पाच विद्यार्थी, ५२ विद्यार्थिनी आणि एका महिलेचा समावेश आहे. जिंदाल कंपनीच्या जेएसडब्ल्यू बंदरात नियमित देखभाल-दुरुस्तीचं काम सुरू असताना दुपारी इथिल मरकॅप्टन या वायूची थोड्या प्रमाणात गळती झाली. त्यामुळे जयगडमधलं माध्यमिक विद्यालय आणि कला, वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालय इथल्या विद्यार्थ्यांना त्याचा त्रास झाल्याची माहिती अपर जिल्हाधिकारी शंकर बर्गे यांनी दिली.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा