रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या काजु उत्पादक जिल्ह्यांमध्ये काजूला हमीभाव मिळावा या मागणीसाठी रत्नागिरी तालुक्यात एक दिवसाचं लाक्षणिक उपोषण सुरू आहे.
गोळप इथले शेतकरी आणि सामाजिक कार्यकर्ते अविनाश काळे हे रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर उपोषण करत आहेत. गावठी काजू बियांना १६० रुपये, तर वेंगुर्ला जातीच्या काजू बियांना १८० रुपये हमीभाव मिळावा, अशी मागणी काळे यांनी केली आहे.