रत्नागिरीत चाचा नेहरू बालमहोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. जिल्हा महिला आणि बालविकास अधिकारी कार्यालयाने रत्नागिरी शहरातल्या छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावर या बालमहोत्सवाचं आयोजन केलेलं आहे. येत्या पाच जानेवारीपर्यंत हा बालमहोत्सव सुरु राहणार असून या महोत्सवात ५०० मुला-मुलींनी सहभाग घेतला आहे. क्रिकेट, खो-खो, कबड्डी अशा क्रीडाप्रकारांबरोबरच निबंध, चित्रकला, सामूहिक गायन, नाटिका अशा सांस्कृतिक स्पर्धाही होणार आहेत. जिल्ह्यात बालकल्याण क्षेत्रात कार्यरत असलेल्या शासकीय स्वयंसेवी संस्थांमध्ये पुनर्वसनासाठी दाखल झालेल्या अनाथ, निराधार मुलांमधल्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी दर वर्षी हा बालमहोत्सव आयोजित केला जातो.
Site Admin | January 3, 2025 3:22 PM | Ratnagiri