रत्नागिरी जिल्ह्यातल्या जयगडमधल्या वायुगळतीच्या प्रकरणात जेएसडब्ल्यू पोर्ट लिमिटेड कंपनीच्या चौघांवर फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वायुगळतीचं कारण शोधण्यासाठी मुंबई किंवा पुण्यातून तज्ज्ञांना बोलावलं जाणार आहे. दरम्यान, आणखी ३३ मुलांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आलं असून, सात मुलांवर उपचार सुरू आहेत. ‘गॅस वाहतूक बंद होत नाही, तोपर्यंत मुलांना शाळेत न पाठवण्याची भूमिका पालकांनी घेतली असून, उद्यापर्यंत गॅस वाहतूक करणारे ट्रक तिथून हलवावेत, अन्यथा बुधवारी आंदोलन केलं जाईल,’ असा इशारा जयगड पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाने कंपनी व्यवस्थापनाला पत्र लिहून दिला आहे.
Site Admin | December 15, 2024 3:07 PM | jindal company | Ratnagiri