रत्नागिरी जिल्ह्यात संगमेश्वर तालुक्यातल्या श्री कर्णेश्वर मंदिराच्या प्रांगणात कलांगण आयोजित तिसरा संगीत कला महोत्सव उद्यापासून ८ डिसेम्बरपर्यंत रंगणार आहे. राज्य शासनाच्या पुरातत्व आणि वस्तुसंग्रहालयाच्या सौजन्याने होणाऱ्या या महोत्सवात संवादिनीगंधर्व पंडित गोविंदराव पटवर्धन यांच्या जन्मशताब्दीनिमित्त अनेक कलाकार आपली कला सादर करणार आहेत. या महोत्सवाच्या कालावधीत सावर्ड्याचं सह्याद्री स्कूल ऑफ आर्ट आणि देवरूखचं डी-कॅड कॉलेज यांचं चित्र आणि कला प्रदर्शनही रसिकांना पाहता येणार आहे.