डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

पुरी इथल्या भगवान जग्गनाथाचे रत्नभंडार ४६ वर्षांनंतर पुन्हा खुले

ओदिशातल्या भगवान जगन्नाथांचं रत्नभांडार उघडण्याची प्रक्रिया आज दुपारी सुरू झाली. ही संपूर्ण प्रक्रिया सरकारने आखून दिलेल्या मानकांनुसार पार पडली असून तिचं व्हिडीओ चित्रीकरण करण्यात आलं आहे. रत्नभांडारात दुर्मीळ दागिने, रत्नं, सोनं यांचा समावेश आहे. हा मौल्यवान ऐवज ठेवलेल्या पेट्या कडेकोट सुरक्षा व्यवस्था असलेल्या खोलीत तात्पुरत्या स्वरुपात ठेवल्या आहेत. या ऐवजाची मोजदाद करण्यात येईल. हे रत्नभांडार यापूर्वी १९८५ मध्ये उघडण्यात आलं होतं, तर यातल्या मौल्यवान वस्तूंची मोजदाद शेवटची १९७८ मध्ये झाली होती.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा