रेशनच्या तांदळाची अवैध वाहतूक करणारा ट्रक भंडारा पोलिसांनी पकडला असून ८ लाख ६७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. हा ट्रक नांदेडवरून गोंदियाच्या दिशेने जात असल्याची माहिती भंडारा जिल्ह्याच्या स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी ही कारवाई केली असून जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांच्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Site Admin | September 16, 2024 3:12 PM | Bhandara Police