राष्ट्रीय पोलाद प्राधिकरणाच्या पुनरुज्जीवनासाठी केंद्रिय मंत्रीमंडळानं 11 हजार 440 कोटी रुपयांच्या निधीला मान्यता दिली आहे. असं माहिती आणि प्रसारणमंत्री अश्विनी वैष्णव यांनी काल माध्यमांशी बोलताना सांगितलं.
आंध्रप्रदेश स्थित ही कंपनी पोलाद उत्पादनासाठी महत्वाची आहे. या निधीमुळे कंपनीत काम करणारे कर्मचारी आणि संबंधित सर्व आस्थापनांना दिलासा मिळणार असल्याचं वैष्णव यावेळी बोलताना म्हणाले.