राज्याच्या पोलीस महासंचालक पदी रश्मी शुक्ला यांची पुनर्नियुक्ती झाली आहे. निवडणूक आयोगाच्या निर्देशांनुसार शुक्ला यांच्या जागी संजयकुमार वर्मा यांची नेमणूक झाली होती. आणि शुक्ला यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलं होतं. शुक्ला यांना पदावरुन हटवण्याची मागणी काँग्रेसने केली होती. आता निवडणूक प्रक्रीया संपल्यानंतर शुक्ला यांना पुन्हा नियुक्त करण्याचा आदेश गृहमंत्रालयानं काल काढला आहे.
Site Admin | November 26, 2024 2:38 PM | Rashmi Shukla
राज्याच्या पोलीस महासंचालक पदी रश्मी शुक्ला यांची पुनर्नियुक्ती
