किमान आधारभूत किंमतींपेक्षा कमी दराने शेतमालाची खरेदी होणार नाही याची खबरदारी घेण्याच्या सूचना कृषी आयुक्त रावसाहेब भागडे यांनी कृषी पणन मंडळाला दिल्या आहेत. शेतमालाची एमएसपीपेक्षा कमी दराने खरेदी झाली तर शेतकऱ्यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सचिवांना संपर्क करण्याचे आवाहन त्यांनी केलं.
शेतमालाच्या बाजार व्यवस्थापनाचे अचूक नियोजन करण्यासाठीच्या राज्यस्तरीय समन्वय समितीच्या बैठकीत ते पुण्यात बोलत होते. एमएसपी आणि प्रत्यक्ष बाजारभाव यांचे सनियंत्रण करण्यासाठीची यंत्रणा जिल्हा तसंच तालुका पातळीवर सक्रिय असावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.