रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत, नागपूर इथं सुरु असलेल्या अंतिम सामन्यात आज तिसऱ्या दिवसअखेर केरळचा पहिला डाव ३४२ धावांवर संपला. त्यामुळे विदर्भाला पहिल्या डावात ३७ धावांची आघाडी मिळाली.
केरळचा आदित्य सरवटे आज ७९ धावांवर बाद झाला. त्यानंतर कर्णधार सचिन बेबीनं डाव सावरण्याचा प्रयत्न केला. त्याचं शतक थोडक्यात हुकलं. तो ९८ धावांवर बाद झाला. इतर फलंदाज दीर्घ खेळी करु शकले नाहीत. विदर्भातर्फे दर्शन नळकांडे, हर्ष दुबे आणि पार्थ रेखाडे यांनी प्रत्येकी तीन गडी बाद केले.