रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेच्या अंतीम सामन्याच्या दुसऱ्या दिवशी विदर्भ संघाचा पहिला डाव ३७९ धावांवर आटोपला.
केरळच्या संघानं नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. फलंदाजीसाठी उतरलेल्या विदर्भ संघाची सुरुवात अडखळत झाली. मात्र दानिश मालेवार यानं झुंझार शतकी खेळी करत संघाचा डाव सावरला. केरळकडून ईडन टॉम आणि निधीश यांनी प्रत्येकी आणि नेदुमंकुझी बसील याने दोन गडी बाद केले.
या स्पर्धेच्या इतिहासात केरळनं पहिल्यांदाच अंतिम फेरी गाठली आहे. उपांत्य फेरीत केरळनं गुजरात विरोधात पहिल्या डावातल्या आघाडीच्या जोरावर अंतिम फेरीत प्रवेश केला, तर दोन वेळच्या विजेत्या विदर्भानं मुंबईला नमवत अंतिम फेरी गाठली.