रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेच्या विजेतेपदासाठी विदर्भ आणि केरळ यांच्यातल्या अंतिम सामन्याला आज नागपूरमधे सुरुवात झाली. केरळनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला. त्यानंतर पहिल्या सत्राच्या खेळात केरळनं अवघ्या २४ धावांमध्येच विदर्भाचे आघाडीचे तीन फलंदाज तंबूत धाडले. मात्र त्यानंतर चौथ्या गड्यासाठी दानिश मालेवार यानं झुंझार शतकी खेळीसह करूण नायर याच्यासोबत दीड शतकी भागिदारी करत विदर्भाचा डाव सावरला. केरळच्या निधीश यानं विदर्भाचे दोन गडी बाद केले.
शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा पहिल्या डावात विदर्भाच्या ३ बाद १७२ धावा झाल्या होत्या.
या स्पर्धेच्या इतिहासात केरळनं पहिल्यांदाच अंतिम फेरी गाठली आहे.
उपांत्य फेरीत केरळनं गुजरात विरोधात पहिल्या डावातल्या आघाडीच्या जोरावर अंतिम फेरीत प्रवेश केला, तर दोन वेळच्या विजेत्या विदर्भानं मुंबईला नमवत अंतिम फेरी गाठली.