रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत आज नागपुरात सुरु झालेल्या दुसऱ्या उपांत्य सामन्यात विदर्भानं दिवसअखेर ५ बाद ३०८ धावा केल्या.
मुंबईविरुद्धच्या या सामन्यात विदर्भानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करायचा निर्णय घेतला. दानीश मालेवारनं ७९, तर धुव्र शोरीनं ७४ धावा केल्या. करुण नायरनं ४५ धावांचं योगदान दिलं. आजचा खेळ थांबला तेव्हा यश राठोड ४७, तर कर्णधार अक्षय वाडकर १३ धावांवर खेळत होता.
मुंबईतर्फे शिवम दुबे आणि शम्स मुलानी यांनी प्रत्येकी २, तर रॉयस्टन डायसनं १ गडी बाद केला.
अहमदाबाद इथं सुरु असलेल्या पहिल्या उपांत्य सामन्यात, गुजरातविरुद्ध, प्रथम फलंदाजी करताना केरळनं पहिल्या दिवसअखेर चार बाद २०६ धावा केल्या. आजचा खेळ थांबला तेव्हा कर्णधार सचिन बेबी ६९, तर महंमद अजहरुद्दीन ३० धावांवर खेळत होता.