रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत नागपूरमधे सुरू असलेल्या उपान्त्य सामन्यात विदर्भानं पहिल्या डावात मुंबईसमोर ३८३ धावांचा डोंगर उभारला आहे. काल नाणेफेक जिंकून विदर्भाने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दिवसअखेर त्यांच्या ५ बाद ३०८ धावा झाल्या होत्या. मुंबईचा डाव सुरु झाला असून चहापानापर्यंत त्यांच्या २ गडी बाद ८५ धावा झाल्या होत्या.
अहमदाबाद मधे दुसरा उपांत्य सामना केरळ आणि गुजरात दरम्यान सुरू असून, केरळनं काल पहिल्या दिवसअखेर ४ बाद २०६ धावा केल्या. आज दुसऱ्या दिवशी, शेवटचं वृत्त मिळालं तेव्हा त्यांच्या ५ बाद ३५४ धावा झाल्या होत्या.