मुंबईत सुरु असलेल्या सामन्यात मुंबईनं पहिल्या डावात मोठी धावसंख्या उभारत मेघालयाची दाणादाण उडवली. मेघालयाचा पहिला डाव काल पहिल्या दिवशी ८६ धावांवर संपल्यानंतर मुंबईनं आज ७ बाद ६७१ धावसंख्येवर पहिला डाव घोषित केला. सिद्धेश लाडनं १४५, आकाश आनंदनं १०३, शम्स मुलानीनं नाबाद १०० धावा केल्या. मेघालयानं आज दिवसअखेर दोन गडी गमावून २७ धावा केल्या.
रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत सोलापूर इथं सुरु असलेल्या, सामन्यात आज दुसऱ्या दिवसअखेर महाराष्ट्र त्रिपुरापेक्षा ३५ धावांनी पिछाडीवर राहिला. त्रिपुरानं पहिल्या डावात २७० धावा केल्या. महाराष्ट्रानं आज दिवसअखेर ३ बाद २३५ धावा केल्या. आजचा खेळ थांबला तेव्हा सिध्देश वीर ९३ तर कर्णधार अनिकेत बावणे ३१ धावांवर खेळत होता यश क्षीरसागरनं ७१ धावा केल्या.