नाशिकमध्ये उद्यापासून महाराष्ट्र विरुद्ध बडोदा या दोन संघांदरम्यान रणजी ट्रॉफी क्रिकेट सामन्याला सुरुवात होत आहे. नूतनीकरण झालेल्या हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर प्रथमच हा सामना होत आहे. २०१८ नंतर प्रथमच नाशिकमध्ये रणजीचा सामना होत असून तो २६ जानेवारीपर्यंत चालणार आहे. सामन्यात महाराष्ट्राच्या संघाचं नेतृत्व ऋतुराज गायकवाड करत असून बडोद्यााचा संघ कृणाल पांड्याच्या नेतृत्वाखाली खेळणार आहे.