डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

रणजी क्रिकेट करंडक स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत हरियाणा विरुद्ध मुंबई सामन्यात दिवसअखेरीस मुंबई संघाच्या ८ गडी बाद २७८ धावा

रणजी क्रिकेट करंडक स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत हरियाणा विरुद्ध मुंबई सामन्यात आज दिवसअखेरीस मुंबई संघाच्या ८ गडी बाद २७८ धावा झाल्या. सुरुवातीला नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेणाऱ्या मुंबई संघाची सुरुवात निराशाजनक झाली. अवघ्या २५ धावसंख्येवर त्यांचे ४ फलंदाज तंबूत परतले. नंतरच्या फलंदाजांनी डाव सावरला. शम्स मुलाणीने ९१ धावा काढत तनुष कोटियनबरोबर ११० धावांची महत्त्वाची भागीदारी केली. अखेर जयंत यादवच्या चेंडूवर त्यालाच झेल देऊन तो बाद झाला.

नागपूरमधे विदर्भ विरुद्ध तमिळनाडू हा सामना सुरु झाला. विदर्भ संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दानिश मालेवारची पाऊण शतकी तर करुण नायरची शतकी खेळी हे आजच्या दिवसाचं वैशिष्ट्य. दिवसअखेर विदर्भची धावसंख्या ६ गडी बाद २६४ झाली होती.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा