अयोध्येतल्या राम मंदिरात आज दुपारी बारा वाजता विशेष किरणोत्सव साजरा करण्यात आला. रामलल्लाच्या कपाळावर सूर्याच्या किरणांनी तिलक लावल्यानंतर श्रीरामांना छपन्न भोग अर्थात नैवेद्य दाखवण्यात आला. रामजन्मोत्सवानिमित्त जगाच्या कानाकोपऱ्यातून अयोध्येत आलेल्या भाविकांवर, ड्रोनच्या सहाय्यानं शरयू नदीतल्या पाण्याचा शिडकावा करण्यात आला. याशिवाय आज संध्याकाळी मंदिरात दीपोत्सव साजरा केला जाणार आहे.
महाराष्ट्रात नागपूरमधलं पोद्दारेश्वर राम मंदिर, नाशिक मधलं काळाराम मंदिर, हिंगोली शहरातलं संकट मोचन हनुमान मंदिर, छत्रपती संभाजीनगर इथल्या राम मंदिरांसह शिर्डी, शेगांव आणि विविध मंदिरांमध्ये फुलांची आकर्षक सजावट तसंच विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.