देशात लोकशाही नाही असं मानणाऱ्या राहूल गांधी यांच्या पक्षाचे 99 खासदार कसे निवडून आले, असा प्रश्न केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केला आहे. ते आज धर्मशाला इथं दौऱ्यावर असताना बातमीदारांशी बोलत होते. राहुल गांधी लोकशाहीमुळेच ते विरोधी पक्षनेता बनू शकले आहेत, असा दावा त्यांनी केला. हिमाचल प्रदेश मधल्या मंडी इथं मशिदी वरून झालेल्या वादावर ते म्हणाले की, संविधानाच्या अंतर्गत कायदेशीर मार्गानं तो़डगा काढावा.
Site Admin | September 13, 2024 8:38 PM | Ramdas Athawale
राहुल गांधी यांच्या पक्षाचे ९९ खासदार कसे निवडून आले ? – राज्यमंत्री रामदास आठवले
