ईद ऊल फित्र अर्थात रमजान ईद काल देशभर उत्साहात साजरी करण्यात आली. पवित्र रमजान महिन्यानंतर येणाऱ्या या सणानिमित्त काल ठिकठिकाणच्या मशिदी आणि ईदगाहमध्ये सामूहिक नमाज अदा करण्यात आली. मुस्लीम बांधवांनी एकमेकांना भेटून शुभेच्छा, मिठाई आणि भेटवस्तू देत ईदचा आनंद साजरा केला. राज्यात मुंबई पुण्यासह सर्वत्र ईदचा उत्साह होता
पुणे सोलापूर रस्त्यावरील ईदगाह मैदानावर हजारो मुस्लिमधर्मीय नागरिकांनी सामूहिक नमाज अदा केली. सामाजिक, राजकीय क्षेत्रातील नेत्यांनी मुस्लिम बांधवांना गुलाबाचं फुल देऊन रमजान ईदच्या शुभेच्छा दिल्या.
Site Admin | April 1, 2025 9:33 AM | रमजान ईद
रमजान ईदचा सण राज्यात सर्वत्र उत्साहात साजरा
