रामनवमी निमित्त राज्यात अनेक ठिकाणी रामजन्मोत्सव साजरा होणार असून त्या दृष्टीनं मंदिरांमधे तयारी सुरु आहे. शिर्डीमध्ये साईबाबा समाधी मंदिरात आज पासून रामनवमी उत्सवाला प्रारंभ झाला असून तो ७ एप्रिल पर्यंत चालणार आहे. या उत्सवानिमित्त मंदिरात फुलांची सजावट करण्यात आली असून मंदिरावर विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.
गोंदिया शहरात रामनवमीनिमित्त आज बाईक रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. श्रीराम मंदिरापासून सुरु झालेल्या या रॅलीत मोठ्या संख्येने युवकांनी भाग घेतला. अनेक ठिकाणी नागरीकांनी आपल्या घरासमोरून रॅली जात असताना फुलांचा वर्षाव करत स्वागत केलं.