अंधेरी दंडाधिकारी न्यायालयानं काल प्रसिद्ध चित्रपट निर्माते राम गोपाल वर्मा यांना चेक बाउन्स प्रकरणात तीन महिन्यांची कारावासाची शिक्षा सुनावली आहे. तसंच वर्मा यांनी तीन महिन्यांच्या आत ३ लाख ७२ हजार रुपये भरपाई देण्याचे निर्देश ही न्यायालयानं दिले आहेत.
वर्मा हे खटल्याच्या वेळी अनुपस्थित असल्यानं न्यायालयाने त्यांच्या अटकेसाठी अजामीनपात्र वॉरंट जारी केलं आहे. हा खटला महेशचंद्र मिश्रा यांच्या वतीनं श्री नावाच्या कंपनीनं वर्मा यांच्या कंपनीविरुद्ध कलम १३८ अंतर्गत दाखल केला होता.