बॉयलर संदर्भातल्या शंभर वर्षं जुना कायदा रद्द करून, बॉयलर दुरुस्ती विधेयक, २०२४ आज राज्यसभेत मंजूर झालं. या विधेयकाच्या मंजुरीनंतर केंद्र सरकार केंद्रीय बॉयलर मंडळाची स्थापन करू शकणार आहे, अशी माहिती केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी आज राज्यसभेत दिली. या विधेयकात बॉयलरमध्ये काम करणाऱ्या कामगारांच्या सुरक्षेसाठी विशेष तरतूद केली आहे. तसंच, बॉयलरच्या दुरुस्तीच्या कामासाठी सुयोग्य आणि सक्षम तंत्रज्ञ नेमला जाणं अनिवार्य असेल. देशातल्या ४० लाखांहून अधिक बॉयलर्सना याचा लाभ मिळणार आहे. बॉयलर्समध्ये काम करणाऱ्या कामगारांना सुरक्षा मिळवून देणं, हेच या विधेयकामागचं उद्दिष्ट असल्याचंही पीयूष गोयल यांनी सांगितलं.
Site Admin | December 4, 2024 7:07 PM | Boilers Bill 2024 | Rajyasabha