राज्यसभेत विमान संबंधित वस्तू हितरक्षण विधेयक २०२५ वर आज चर्चा झाली. काँग्रेसचे खासदार नीरज डांगी यांनी ‘उडान’ योजनेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. विमानतळांचं खाजगीकरण आणि वाढलेल्या विमान प्रवास भाड्याचा मुद्दा तसंच विमान रुग्णवाहिकांची सेवा देशभरात उपलब्ध होण्याची गरज त्यांनी मांडली. भारतातली अंतर्देशीय विमानसेवा बाजारपेठ जगभरातली तिसऱ्या क्रमांकाची मोठी बाजारपेठ असल्याचं राष्ट्रवादी चे खासदार प्रफुल पटेल यांनी सांगितलं. देशात २०१४ साली फक्त ७४ विमानतळ होते, त्यांची संख्या वाढून आता १४९ झाली आहे, तर विमानप्रवाशांची संख्याही वाढून १६ कोटींवर पोचली असल्याचं भाजपचे खासदार धनंजय महाडिक यांनी सांगितलं. द्रमुक, आम आदमी पक्ष, तेलगू देसम पक्षाच्या खासदारांनीही चर्चेत भाग घेतला.
Site Admin | March 28, 2025 8:13 PM | Budget 2025 | Rajyasabha
राज्यसभेत विमान संबंधित वस्तू हितरक्षण विधेयक २०२५ वर चर्चा
