डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

December 19, 2024 3:07 PM | Loksabha | Rajyasabha

printer

संसदेच्या दोन्ही सभागृहाचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केलेल्या विधानावरुन आज सलग दुसऱ्या दिवशी संसदेच्या दोन्ही सभागृहांमधे गदारोळ झाला. घोषणाबाजीमुळे कामकाज दुपारी दोन वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं. लोकसभेत कामकाज सुरु झाल्यावर काँग्रेस, द्रमुक, समाजवादी पार्टी, आणि इतर पक्षांचे सदस्य अमित शाह यांच्या विरोधात घोषणा देऊ लागले. काही सदस्य सभापतींसमोरच्या मोकळ्या जागेत शिरले. घोषणा चालूच राहिल्याने सभापती ओम बिरला यांनी आधी दुपारी २ वाजेपर्यंत कामकाज तहकूब केलं. त्यानंतरही गदारोळ चालूच राहीला आणि कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं.

 

राज्यसभेत या आणि इतर विषयावरुन विरोधी पक्ष सदस्यांनी दिलेले स्थगन प्रस्ताव अध्यक्ष जगदीप धनखड यांनी फेटाळले. त्याच्या निषेधात काँग्रेस, द्रमुक, आम आदमी पार्टी, समाजवादी पार्टी, राजद, आणि इतर पक्षांच्या सदस्यांनी घोषणा द्यायला सुरुवात केली. गोंधळ वाढतच गेल्यामुळे अध्यक्षांनी दुपारी २ वाजेपर्यंत कामकाज तहकूब केलं. नंतरही घोषणा चालूच राहिल्याने कामकाज दिवसभरासाठी तहकूब झालं.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा