एआय अर्थात कृत्रिम बुद्धिमत्ता आणि मशीन लर्निंग तंत्रज्ञानाचा वापर हवामान तसंच सागरी हवामान बदल अशा क्षेत्रांमध्ये करण्यात येत असल्याची माहिती भूविज्ञान राज्यमंत्री डॉक्टर जितेंद्र सिंह यांनी राज्यसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात दिली आहे. हवामान शास्त्राच्या अंदाजांमध्ये अचूकता आणणं तसंच त्याची कार्यक्षमता वाढवण्याच्या धोरणाचा एक भाग म्हणून विविध उप्रकम राबवले जात आहेत. यात कृषी, आपत्ती व्यवस्थापन, शहरी नियोजन अशा क्षेत्रांचा समावेश आहे. हवामानाचा अंदाज आणखी अचूक देता यावा यासाठी पुण्यातल्या आयआयटीएम इथे विशेष आभासी केंद्राची स्थापनाही करण्यात आल्याचं सिंह यांनी यावेळी सांगितलं. तसंच, ग्रामीण कृषी मौसम सेवा या योजनेअंतर्गत भारतीय हवामानशास्त्र विभाग शेतकऱ्यांना हवामान अंदाजावर आधारित कृषी सल्लागार सेवा पुरवत असल्याचंही ते यावेळी म्हणाले.
Site Admin | December 19, 2024 7:18 PM | Winter Session of Parliament