राज्यसभेत अध्यक्ष जगदीप धनखड यांच्याविरुद्ध काँग्रेसप्रणित इंडिया आघाडीने अविश्वास ठराव मांडला आहे. विरोधी पक्षांच्या सदस्यांना सभागृहात बोलण्याची संधी नाकारुन पक्षपात करत असल्याचा आरोप करत विरोधकांनी हा प्रस्ताव मांडला असल्याचं काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी ट्विटरवर म्हटलं आहे. लोकशाहीच्या रक्षणार्थ नाईलाजाने विरोधी आघाडीला हा निर्णय घ्यावा लागल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
Site Admin | December 10, 2024 3:14 PM | Rajyasabha | Vice President Jagdeep Dhankhar