डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

राज्यसभेचं कामकाज संस्थगित

मणिपूरमधली परिस्थिती निवळण्यासाठी सरकार सातत्याने प्रयत्न करत असल्याचा पुनरुच्चार प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केला आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अभिभाषणाबद्द्ल आभार प्रस्तावाला राज्यसभेत उत्तर देताना “मणिपूरमध्ये शांतता आणि सौहार्द सुनिश्चित करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार सर्व संबंधितांशी चर्चा करत असल्याचं प्रधानमंत्री म्हणाले. मणिपूरमध्ये राहून स्वतः गृहमंत्र्यांनी शांततेसाठीच्या वाटाघाटी घडवून आणल्या. मणिपूरमधे हिंसाचाराच्या घटना सातत्याने कमी होत असल्याचं सत्य आपण मान्य केलं पाहिजे यावर मोदी यांनी भर दिला. मणिपूरमध्ये शाळा, महाविद्यालयं, कार्यालयं आणि इतर संस्था नेहमीप्रमाणे सुरू असल्याची माहिती त्यांनी सभागृहाला दिली. प्रधानमंत्री हे बोलत असतानाच काँग्रेस, द्रमुक, टीएमसी, आम आदमी पार्टी, आरजेडी, डावे आणि इतर विरोधी पक्ष सदस्यांनी गदारोळ केला. अध्यक्ष जगदीप धनखड यांनी त्यांना आपल्या जागी जाऊन बसण्याची विनंती केली. त्यानंतर विरोधी पक्षांनी सभात्याग केला. विरोधकांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांची उत्तरं ऐकण्याचं धाडस विरोधकांमध्ये नाही. सभात्याग करणं हा सभागृहाचा अपमान आहे. अशी प्रतिक्रीया विरोधकांच्या सभात्यागावर प्रधानमंत्र्यांनी दिली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी दोन्ही सभागृहांच्या संयुक्त बैठकीत केलेल्या अभिभाषणाबद्दल सभागृहाने धन्यवाद प्रस्ताव मंजूर केल्यावर राज्यसभेचं कामकाज काल संस्थगित करण्यात आलं.

 

सर्वाधिक वाचले

सर्व पहा